हे सर्वत्र पोहोचवा! 12:21असेन्शन पोर्टल ऐक्टिवेशन भाग २, २५ जुलै २०२६ - Marathi Promotional Video 10 @WeLoveMassMeditation
हे सर्वत्र पोहोचवा! 12:21असेन्शन पोर्टल ऐक्टिवेशन भाग २, २५ जुलै २०२६ - Marathi Promotional Video 10  @WeLoveMassMeditation
Uploaded July 2026 | Updated November 2026, 4 days ago
पुन्हा एकदा कृती करण्याची वेळ आली आहे! आपल्या जगाचे भवितव्य आपल्या स्वतःच्या हातात घेण्याची वेळ आली आहे! पृथ्वीच्या मुक्तीची प्रक्रिया खूपच जास्त वेळ घेत आहे, याबाबत आपण सर्व सहमत आहोत. हीच आपली संधी आहे की आपण एकत्रितपणे पृथ्वीच्या मुक्तीच्या प्रक्रियेला गती देऊ आणि या ग्रहासाठी 12:21 असेन्शन पोर्टल दुसऱ्या टप्प्याच्या उघडण्यास सहाय्य करू. म्हणूनच, जुलै महिन्यात घडणाऱ्या या महत्त्वपूर्ण ज्योतिषीय संयोगांच्या संधीचा उपयोग करून आपण एक द्वार निर्माण करत आहोत. ज्याद्वारे आपण आपल्या चेतनेचे एकत्रीकरण करू आणि ग्रहासाठीच्या आरोहण कालरेषेला सर्वाधिक अनुकूल बनविणाऱ्या प्रक्रियेला प्रारंभ करू.

आपण या सक्रियतेमध्ये सहभागी होणाऱ्या १,४४,००० लोकांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठू शकतो! यामुळे जगभरातील ऊर्जा क्षेत्रामध्ये उपचार आणि सकारात्मक परिवर्तनाची एक शक्तिशाली साखळी प्रतिक्रिया निर्माण होईल.

२४ मे रोजी न्यू हेवन आणि न्यू अर्थच्या किल्ल्यांच्या (Keys) एकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली.

यामुळे मानसिक (Mental), सूक्ष्म किंवा खगोलिक (Astral), ईथरिक (Etheric) आणि भौतिक (Physical) स्तरांवरील पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ३० मीटरच्या स्तरात अस्तित्वात असलेल्या लर्कर-निर्मित क्वांटम क्षेत्रातील विसंगतीच्या सर्वांत आंतरिक स्तराचे प्रकटीकरण झाले आहे. हा नरकीय स्तर गेल्या २६,००० वर्षांपासून येथे अस्तित्वात आहे आणि मानवी दुःखाचे प्रमुख उर्वरित कारण मानला जातो. ९ जुलैनंतर, प्रकाशशक्ती (Light Forces) २५ जुलै रोजी होणाऱ्या आपल्या सक्रियतेसाठी जागा निर्माण करण्याच्या उद्देशाने त्या क्षेत्राचे निर्मूलन करण्यास सुरुवात करतील.

आता, २५ जुलै २०२६ रोजी चार दशकांनंतर प्रथमच नेपच्यून आणि प्लूटो यांचा अचूक षडाष्टक (Neptune–Pluto Sextile) होईल. यामुळे सुवर्णयुगाच्या ऊर्जांचा पुन्हा एकदा प्रवाह सुरू होईल:

donlehmanjr.com/Astrology/AstroLetters/astroletter9%20Pattern%20of%20Hope

आपले 12:21 असेन्शन पोर्टल ऐक्टिवेशन २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ५:५३ UTC (भारतीय वेळेनुसार सकाळी ११:२३ IST) वाजता होईल. आपल्या वेळक्षेत्रानुसार ध्यानाची वेळ येथे तपासू शकता:

timeanddate.com/worldclock/fixedtime.html?msg=12%3A21+ASCENSION+PORTAL+ACTIVATION+PART+2&iso=20260725T0753&p1=195

१. स्वतःला शांत आणि विश्रांतीपूर्ण चेतनास्थितीत आणण्यासाठी आपल्या आवडीचे कोणतेही ध्यानतंत्र वापरा.

२. आपल्या मनात स्पष्ट संकल्प करा की हे ध्यान आपण 12:21 असेन्शन पोर्टल ऐक्टिवेशन प्रक्रियेस सहाय्य करण्यासाठी करत आहात.

३. व्हायोलेट फ्लेम (Violet Flame) तिच्या मूळ दिव्य स्रोतामधून आवाहन करा आणि ध्यानादरम्यान तसेच ध्यानानंतरही आपल्या सभोवताली संरक्षणाचे एक प्रकाशमय वर्तुळ निर्माण होत असल्याची कल्पना करा. तिला विनंती करा की प्रकाशशी सुसंगत नसलेल्या सर्व ऊर्जांचे, विचारांचे, भावनांचे आणि प्रभावांचे रूपांतरण व शुद्धीकरण व्हावे.

४. न्यू हेवन (New Heaven) मधील मोत्यासारख्या तेजस्वी निळ्या (Opalescent Blue) प्रकाशाची एक दिव्य लहर आकाशातून खाली उतरून आपल्या हृदय चक्रात (Heart Chakra) प्रवाहित होत आहे, अशी कल्पना करा. आणि या प्रक्रियेला समर्थन देणारे सर्व प्रकाशमय वैश्विक अस्तित्वे (Cosmic Beings of Light) दिव्य सहाय्य पाठवत आहेत. न्यू अर्थ (New Earth) च्या पाचूसारख्या तेजस्वी हिरव्या (Emerald Green) प्रकाशाची एक दिव्य लहर पृथ्वीच्या अंतरंगातून वर येत आपल्या हृदय चक्रात (Heart Chakra) प्रवेश करत आहे, अशी कल्पना करा. या प्रक्रियेला समर्थन देणारी सर्व प्रकाशमय भूमिगत (Subterranean) अस्तित्वे दिव्य सहाय्य पाठवत आहेत. न्यू हेवनचा मोत्यासारखा नीलवर्णी प्रकाश आणि न्यू अर्थचा पाचूसारखा हिरवा प्रकाश आपल्या हृदय चक्रात एकरूप होत आहेत, अशी कल्पना करा. या दोन दिव्य ऊर्जांच्या मिलनातून स्वर्गीय निळसर-हिरव्या (Opalescent Blue-Green) प्रकाशाचे एक तेजस्वी क्षेत्र निर्माण होत आहे, जे आपल्या सभोवताली विस्तारत आहे. आपल्या गोल्डन टाइमलाइनची (Golden Timeline) कल्पना करा आपण नेहमी ज्या जीवनाचे स्वप्न पाहिले आहे, ते जीवन आता आपल्या समोर सुंदरपणे उलगडत आहे.

5. पृथ्वीवरील घटनांचा आणि सामूहिक चेतनेचा प्रवाह सर्वाधिक सकारात्मक, सुसंवादी आणि कल्याणकारी कालरेषेकडे वळत आहे, अशी कल्पना करा आणि संपूर्ण ग्रह क्रमाक्रमाने प्लॅनेटरी गोल्डन टाइमलाइनमध्ये संक्रमण करत आहे. न्यू हेवनचा मोत्यासारखा झळाळणारा नीलवर्णी प्रकाश आणि न्यू अर्थचा पाचूसारखा हिरवा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर प्रवाहित होत आहे, अशी कल्पना करा. हा प्रकाश सर्व असमानतांवर उपचार करत आहे, सर्व दुःखांचे रूपांतर करत आहे आणि दारिद्र्य व अभावाच्या परिस्थिती दूर करून सर्वांसाठी समृद्धीचा मार्ग निर्माण करत आहे. मानवजातीमध्ये एका महान आध्यात्मिक जागृतीची (Spiritual Awakening) सुरुवात होत आहे आणि एका नव्या पुनर्जागरणाचा (New Renaissance) उदय होत आहे, अशी कल्पना करा. कुंभयुगाच्या (Age of Aquarius) नव्या महान वैश्विक चक्राची सुरुवात होत आहे, अशी कल्पना करा. आणि पृथ्वीवरील सर्व जीवांपर्यंत शुद्ध प्रकाश, निरपेक्ष प्रेम आणि खऱ्या आनंदाच्या ऊर्जांचा प्रवाह पोहोचवत आहे.

या ध्यानासाठी सुचविलेला कालावधी २० मिनिटांचा आहे.

12:21असेन्शन पोर्टल ऐक्टिवेशन भाग २, नवीन घडामोडी व अद्ययावत माहिती

2012portal.blogspot.com

हा व्हिडिओ तयार करणारे: Varsányi Anna – MCCS,

मूळ व्हिडिओ अपलोड करणारे: Szeretjük a Tömegmeditációkat

youtube.com/@szeretjukatomegmeditacioka3628
हे सर्वत्र पोहोचवा! 12:21असेन्शन पोर्टल ऐक्टिवेशन भाग २, २५ जुलै २०२६ - Marathi Promotional Video 10個人のゴールデンタイムライン活性化 - Japanese guided audioदेवी की वापसी का ध्यान - Hindi guided audioजंगल की आग को रोकने के लिए ध्यान - Hindi guided audioPersian guided audio - مدیتیشن بازگشت الههMeditazione per guarire i danni causati dai terremoti - Italian guided audioAktivacija portala Povzdignjenja 12:21 - 2. del (z vizualizacijami) - Slovenian guided audio 2Meditation to calm volcanic activities - English guided audioAntariona Transformācijas Protokols - Latvian guided audio12:21 ASCENSION PORTAL ACTIVATION - JULY 25TH 5:53 AM UTC - English Shorts 2 #ascensionportalMeditaatio maanjäristysten aiheuttamien vahinkojen parantamiseen - Finnish guided audioAKTIVERING AV OPPSTIGNINGSPORTALEN 12.21 - DEL 2, 25. JULI 2026, Norwegian Promotional Video 6
We Love Mass Meditation |

हे सर्वत्र पोहोचवा! 12:21असेन्शन पोर्टल ऐक्टिवेशन भाग २, २५ जुलै २०२६ - Marathi Promotional Video 10

SHARE TO X SHARE TO REDDIT SHARE TO FACEBOOK WALLPAPER